एकही रुपया न खर्च करता तुमचा सिबिल स्कोर चेक करा..| Check Your CIBIL Score for Free

नमस्कार मित्रांनो, सदर लेखांमध्ये आपण एकही रुपया खर्च न करता तुमचा सिबिल स्कोर कसा चेक करायचा? (Check Your CIBIL Score for Free) याविषयीची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत.

Check cibil score: कर्ज किंवा क्रेडिट कार्ड मिळवण्याच्या प्रक्रियेमध्ये सिबिल स्कोर ची भूमिका खूप महत्त्वाची देशांमधील बहुतांश बँका, वित्तीय संस्था त्याचबरोबर नॉन बँकिंग वित्तीय संस्था (NBFC) एखाद्याला कर्ज किंवा क्रेडिट कार्ड द्यायचे की नाही हे सिबिल स्कोर च्या आधारावर ठरवतात. तुम्ही जर कर्ज किंवा क्रेडिट कार्ड साठी बँकांकडे किंवा वित्तीय संस्थांकडे त्याचबरोबर नॉन बँकिंग वित्तीय संस्थांकडे अर्ज करत असाल तर अर्ज करण्यापूर्वी तुमचा सिबिल स्कोर किंवा क्रेडिट स्कोर तपासू शकता तेही अगदी मोफत. यामुळे तुम्हाला सदर कर्जासाठी अर्ज करायचा की नाही हे समजू शकेल.

सिबील स्कोर चे महत्त्व

सिबिल स्कोर च्या आधारावर बँक, वित्तीय संस्था, नॉन बँकिंग वित्तीय संस्था कर्ज आणि क्रेडिट कार्डचे संबंधित अनेक गोष्टी ठरवत असते. सिबिल स्कोर च्या माध्यमातूनच वरील संस्थांना कळते की तुम्ही खर्चाची परतफेड करण्यास किती सक्षम आहात.

TransUnion Credit Information Buro (India) Limited (CIBIL) या कंपनीला भारतीय रिझर्व बँकेने भारतीय नागरिकांच्या क्रेडिट संबंधित संपूर्ण माहिती गोळा करण्यासाठी अधिकृत केले आहे. ही भारतातील सर्वात जुनी क्रेडिट माहिती कंपनी आहे. सदर कंपनी ही भारतीय नागरिकांचा क्रेडिट स्कोर 300 ते 900 च्या दरम्यान मोजत असते. सदर कंपनीने दिलेला क्रेडिट अहवाल हा खूपच महत्त्वाचा असतो. या अहवालाच्या माध्यमातूनच बँका, वित्तीय संस्था, नॉन बँकिंग वित्तीय संस्था एखाद्याला कर्ज द्यायचे की नाही हे ठरवत असतात.

नियमित सिबिल स्कोर तपासण्याचे महत्त्व

  • नियमित सिबिल स्कोर तपासण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे, तुमच्या क्रेडिट कार्ड वरील तुमच्या खर्चाच्या परिणाम बद्दल तुम्हाला अपडेट ठेवते.
  • यामुळेच क्रेडिट रिपोर्ट वरील माहिती खरी असल्याची खात्री होते.
  • याच्याद्वारे तुम्ही अर्ज करताना किती वाटाघाटी करू शकता हे जाणून घेण्यास मदत होते.
  • यामुळे तुम्हाला तुमच्या पैशावर नियंत्रण ठेवता येते.
  • याच्याद्वारे कर्ज देणाऱ्या संस्थेवर चांगली छाप पडते.

चांगला सिबिल स्कोर असण्याचे फायदे

चांगला सिबिल स्कोर असणे हे नेहमीच फायदेशीर असते. कर्जासाठी अर्ज करताना चांगला सिबिल स्कोर कर्ज मंजुरीची शक्यता वाढवतो,त्याचबरोबर तुम्हाला अनेक फायदे मिळू शकतात ते खालीलप्रमाणे:

  • त्वरित कर्ज मंजुरी
  • कमी व्याजदर
  • चांगल्या पेमेंट अटी

कमी सिबिल स्कोर असण्याचे तोटे

कमी सिबिल स्कोर चा  कर्जदारावर नकारात्मक परिणाम होऊन त्याचे पुढील परिणाम होऊ शकतात:

  • कर्ज नाकारण्याची उच्च शक्यता
  • उच्च व्याजदर
  • जास्तीत जास्त कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक असते.
  • कमी कर्ज रक्कम मिळते
  • जर तुम्ही कोणतेही EMI पेमेंट चुकवल्यास तुम्हाला कठोर कारवाईला सामोरे जावे लागू शकते.

CIBIL Score मोफत कसा तपासायचा?(Check Your CIBIL Score for Free)

जर तुम्हाला तुमचा सीबी स्कोर मोफत तपासायचा असेल तर, त्याबाबतची स्टेप बाय स्टेप माहिती काळजीपूर्वक फॉलो करा:

  • सर्वप्रथम तुम्हाला CIBIL च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल. 👉🏽https://www.cibil.com
  • त्यानंतर वेबसाईटच्या उजव्या बाजूला Get Your CIBIL Score या पर्यायावर क्लिक करा. यानंतर तुम्हाला सबस्क्रिप्शनचा पर्याय दिसेल, परंतु तुम्हाला तुमचा सिबिल स्कोर मोफत पाहायचा असेल तर तुम्हाला खाली स्क्रोल करावे लागेल.
  • नंतरच्या स्टेप मध्ये तुम्हाला तुमची मूलभूत माहिती जसे की ईमेल आयडी, नाव, पासवर्ड, आयडी प्रुफ मध्ये पॅन कार्ड आणि आधार कार्ड, पत्ता आणि पिन कोड, मोबाईल नंबर इत्यादी माहिती प्रविष्ट करुन स्वीकार आणि सुरू वर क्लिक करा.
  • नंतरच्या स्टेपमध्ये तुम्हाला तुमची ओळख सत्यापित करावी लागेल. यासाठी तुमच्या मोबाईल नंबर वर एक OTP येईल जो तुम्हाला वेबसाईटवर टाकावा लागेल. OTP टाकल्यानंतर Continue वर क्लिक करा.
  • यानंतर तुम्हाला नाव नोंदणी पडताळणीसाठी नवीन पेजवर जावे लागेल. इथे तुम्ही Go to Dashboard या पर्यायावर क्लिक करा.
  • त्यानंतर तुम्ही https://myscore.cibil.com वर या . इथे तुम्हाला तुमचा सिबिल स्कोर दिसेल.

अशाप्रकारे तुम्ही मोफत पणे तुमचा सिबिल स्कोर तपासू शकता.

एकदा तुमचे खाते तयार झाले की, तुम्ही सदस्य लॉगिन पर्याय निवडून सिबिल स्कोर पाहू शकता. पण जर तुमचा सिबिल स्कोर तुम्ही वारंवार पाहणार असाल तर तुम्हाला पैसे द्यावे लागतील. कारण तुम्ही मोफत पणे सिबिल स्कोर हा वर्षातून एकदाच पाहू शकता.

सदर लेखामध्ये आपण एकही रुपया खर्च न करता सिबिल स्कोर कसा चेक करायचा? (Check Your CIBIL Score for Free) याविषयीची संपूर्ण माहिती पाहिली आहे. सदर माहितीच्या आधारे तुम्ही तुमचा सिबिल स्कोर फ्री मध्ये पाहू शकता. असे केल्याने तुमच्या लक्षात येईल की तुम्ही कोणत्याही वित्तीय संस्थेमध्ये कर्जासाठी अर्ज करू शकता की नाही किंवा कोणतीही वित्तीय संस्था तुम्हाला कर्ज देईल की नाही. धन्यवाद!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *