कमी सिबिल स्कोर वर 60,000 रु मिळणार, असा करा अर्ज..|Low CIBIL Score 60k Personal Loan

नमस्कार, सदर लेखामध्ये आपण कमी सिबिल स्कोर वर 60,000 रु. वैयक्तिक कर्ज कसे घ्यायचे?(Low CIBIL Score 60,000 Personal Loan) याविषयीची संपूर्ण माहिती सविस्तरपणे पाहू.

दैनंदिन जीवनामध्ये त्या आवश्यक गरजा त्याचबरोबर भविष्यातील योजना पूर्ण करण्यासाठी पैशाची गरज भासते. मासिक उत्पन्नातून या गरजा पूर्ण करणे शक्य नसल्यामुळे कर्ज घेण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय राहत नाही. अशावेळी कर्ज घेताना वित्तीय संस्थांच्या काही अटी व शर्ती पूर्ण कराव्या लागतात. सदरच्या अटी व शर्ती पूर्ण करणे एखाद्याला शक्य नसल्यास कर्ज मिळणे अवघड होऊन बसते. या अटी व शर्ती मध्ये एक महत्त्वाची अट म्हणजे सिबिल स्कोर चांगला असणे होय. पण कधी कधी सिबिल स्कोर कमी किंवा खराब असू शकतो. अशावेळी कर्ज मिळणे अवघड होऊन बसते. अशा परिस्थितीमध्ये काही नॉन बँकिंग वित्तीय संस्था व एप्लीकेशन तुम्हाला कमी सिबिल स्कोर वर देखील वैयक्तिक कर्ज देतात. सदर लेखांमध्ये आपण अशी कोणती ॲप्लिकेशन आहेत जी कमी सिबिल स्कोरवरही वैयक्तिक कर्ज देतात हेही पाहू.

सध्या खूप असे लोन अप्लिकेशन आहेत की, जे कमी सिबिल स्कोर वर सहजपणे पर्सनल लोन देतात. अशा अनेक नॉन बँकिंग वित्तीय संस्था आहेत की ज्या कमी सिबिल स्कोर वर देखील तुम्हाला फक्त आधार कार्ड वर वैयक्तिक कर्ज देतात. यासाठी कोणत्याही प्रकारच्या गॅरंटीची गरज लागत नाही. परंतु बऱ्यापैकी कंपन्या सिबिल स्कोर च्या आधारावरच कर्ज देणे पसंत करत असतात. जर तुमचा सिबिल स्कोर कमी असला तरीही काही कंपन्या तुम्हाला सहजपणे वैयक्तिक कर्ज देत असतात.

CIBIL Score विषयी थोडक्यात…

सिबिल स्कोर हा तुमचा क्रेडिट इतिहास दर्शवत असतो. क्रेडिट इतिहास जितका चांगला असेल तितका क्रेडिट स्कोर जास्त असतो. सिबिल स्कोर हा 300 ते 900 च्या दरम्यान मोजला जातो. तुमचा सिबिल स्कोर काढताना तुमचा क्रेडिट कार्डचा वापर, क्रेडिट कार्ड बिलाची परतफेड, कर्जाची संख्या, कर्जाची परतफेड विचारात घेतला जातो. जर तुम्ही पेमेंट मध्ये कधीही डिफॉल्ट केले नसेल आणि चांगले क्रेडिट एक्सपोजर असेल तर तुम्हाला 750 किंवा त्याहून अधिक नंबर मिळण्याची शक्यता आहे. तुमचा उच्च  सिबिल स्कोर तुम्हाला केवळ वैयक्तिक कर्ज मिळविण्यात मदत करू शकत नाही तर तुम्हाला चांगले व्याजदर आणि वैयक्तिक कर्जाचे जलद वितरण देखील देऊ शकतो. म्हणूनच आर्थिक व्यवहारांमध्ये सिबिल स्कोर चे महत्व खूप आहे.

Low CIBIL Score 60k Personal Loan पात्रता

  • कमी सिबिल स्कोर वर वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी अर्ज करणारी व्यक्ती ही भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे.
  • सदर व्यक्तीचे वय हे 21 ते 57 वर्षाच्या दरम्यान असावे.
  • अर्जदाराचे मासिक उत्पन्न 25,000 रुपये किंवा त्याहून जास्त असणे आवश्यक आहे.
  • अर्जदाराची उत्पन्न हे थेट अर्जदाराच्या बँक खात्यात जमा करणे आवश्यक आहे.
  • कमी सिबिल स्कोर असूनही कर्ज मिळवण्यासाठी कर्जदार हा कर्ज परतफेड करण्याच्या पात्रतेचा किंवा क्षमतेचा आहे की नाही यासाठी कर्ज घेणाऱ्या कर्जदाराला त्याच्या उत्पन्नाचा पुरावा देणे गरजेचे आहे.
  • बँका किंवा वित्तीय संस्थांना आर्थिक स्थिरता निश्चित करण्यासाठी स्थिर रोजगाराचा इतिहास आणि उत्पन्न देखील आवश्यक आहे.
  • सार्वजनिक आणि खाजगी संस्थांमध्ये काम करणारे त्याचबरोबर व्यावसायिक व्यक्ती कमी सिबिल स्कोर असूनही कर्ज मिळवण्यासाठी अर्ज करू शकतात.
  • कमी सिबिल स्कोर सह वैयक्तिक कर्जासाठी पात्र होण्यासाठी वित्तीय संस्थांकडून आवश्यक असलेल्या पगाराच्या स्लिप्स आणि रोजगाराच्या प्रमाणपत्रासारखी कागदपत्रे सादर करणे गरजेचे आहे.

Low CIBIL Score 60k Personal Loan आवश्यक कागदपत्रे

कमी सिबिल स्कोर वर वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी अर्जदाराला काही कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे. सदरची कागदपत्रे कोणती आहेत ते खालील प्रमाणे:

  • ओळखीच्या पुराव्यासाठी आधार कार्ड, पासपोर्ट, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदार ओळखपत्र इ. यापैकी एक
  • पत्त्याच्या पुराव्यासाठी आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट, युटिलिटी बिले(विज, पाणी, गॅस) गेल्या 60 दिवसातील इ. यापैकी एक
  • उत्पन्नाचा पुरावा
  • मागील 3 महिन्याचे बँक स्टेटमेंट
  • पगार स्लिप्स

Low CIBIL Score Personal Loan App List

कमी सिबिल स्कोर वर वैयक्तिक कर्ज देणारे काही महत्त्वाच्या एप्लीकेशन ची लिस्ट आपण पाहणार आहोत. तुम्ही या दिलेल्या लिस्टमधील तुमच्या पसंतीनुसार कोणत्याही एप्लीकेशन वरून कर्ज घेऊ शकता.

  • Dhani
  • KreditBee
  • NIRA
  • Moneyview
  • Bajaj Finserv
  • mPokket
  • Early Salary
  • Home Credit
  • CASHe
  • PaySense
  • India Lends
  • SmartCoin

Low CIBIL Score 60k Personal Loan व्याजदर व परतफेडीचा कालावधी

कमी सिबिल स्कोर वर वैयक्तिक कर्ज हे तुम्ही कोणत्या एप्लीकेशन वरून घेणार आहात त्यावरून सदर कर्जाचा व्याजदर ठरत असतो. समजा जर तुम्ही moneyview App वरून वैयक्तिक कर्जासाठी अर्ज केला असेल तर व्याजदर हा प्रतिवर्ष 14% पासून सुरू होतो. त्याचबरोबर प्रक्रिया शुल्क हे मंजूर कर्जाच्या 2% पासून सुरू होते. थकित एमआय वर 2% दरमहा व्याज लागू शकते. जर चेक बाउन्स झाला तर प्रत्येक चेक बाउन्ससाठी 500 रुपये पर्यंतचा दंड लागू शकतो.

Moneyview App घेतलेल्या वैयक्तिक कर्जाच्या परतफेडीचा कालावधी 5 वर्षे किंवा 60 महिन्यापर्यंत असू शकतो.

Low CIBIL Score 60k Personal Loan अर्ज प्रक्रिया

कमी सिबिल स्कोर वर वैयक्तिक कर्ज मिळवण्यासाठी अर्जदाराला ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. ऑनलाईन अर्ज कसा करायचा याबाबतची स्टेप बाय स्टेप माहिती खालील प्रमाणे:

  • सर्वप्रथम तुम्हाला तुम्ही ज्या एप्लीकेशन वरून कमी सिबिल स्कोर वैयक्तिक कर्जासाठी अर्ज करणार आहात ते एप्लीकेशन तुमच्या मोबाईल मध्ये Google Play Store वरून डाउनलोड करावे लागेल किंवा वेबसाईटवर जावे लागेल.
  • आपण कमी सिबिल स्कोर वर वैयक्तिक कर्ज moneyview वरून कसे घ्यायचे याबाबतची माहिती पाहणार आहोत. त्यामुळे आपणास या ठिकाणी Moneyview वेबसाईटला भेट देणे आवश्यक आहे.👇🏼👉🏽 https://moneyview.in/personal-loan
  • वेबसाईटवर गेल्यानंतर सर्वप्रथम तुमचा आवश्यक तपशील देणे गरजेचे आहे. त्यानंतर तुमची तात्काळ कर्ज पात्रता तपासा.
  • त्यानंतर Moneyview तुमच्या पात्रतेवर तुम्हाला कर्जाचे विविध पर्याय देते. तुमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तुमच्या पसंतीची कर्ज रक्कम (60k) आणि EMI रक्कम निवडा.
  • सदर कर्जासाठी लागणारी कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा.
  • तुमचा अर्ज व अपलोड केलेल्या कागदपत्राची पडताळणी केल्यानंतर आणि अर्ज यशस्वीरित्या सबमिट केल्यानंतर कर्जाचे रक्कम तात्काळ तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाईल.

अशा पद्धतीने तुम्ही low CIBIL score 60k personal loan साठी अर्ज करू शकता.

सदर लेखांमध्ये आपण low CIBIL score 60k personal loan कसे घ्यायचे याबाबतची संपूर्ण माहिती पाहिली आहे. सदर माहितीच्या आधारे तुम्ही कमी सिबिल स्कोर वर वैयक्तिक कर्ज घेऊन तुमच्या अत्यावश्यक गरजा पूर्ण करू शकता. धन्यवाद!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *