व्यवसाय करण्यासाठी मुद्रा योजनेअंतर्गत 20 लाख रुपयापर्यंत कर्ज मिळवा तेही विनातारण | pm mudra loan scheme

सरकार नेहमीच नागरिकांसाठी नवनवीन योजना राबवत असते. देशातील नागरिकांना आर्थिक मदत व्हावी, या उद्देशाने योजना राबवल्या जातात. यातीलच एक योजना म्हणजे “-प्रधानमंत्री मुद्रा योजना”.या योजनेमध्ये शासन स्वतःचा बिझनेस सुरू करण्यासाठी तरुणांना कर्ज देते. ज्या तरुणांना स्वतःच व्यवसाय सुरू करण्याची इच्छा आहे त्या तरुणांसाठी ही योजना राबवण्यात आली आहे.
अर्थमंत्री निर्मला सीताराम यांनी 23 जुलै 2024 रोजी आर्थिक वर्ष 2024 25 चा अर्थसंकल्प सादर करताना घोषणा केली होती की, प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत दहा लाख रुपयांचे कर्ज मर्यादा वाढवून 20 लाख करण्यात येईल. आता या घोषणाची अंमलबजावणी करण्यात आली आहे. वित्त मंत्रालयाने बोलले आहे की मर्यादा वाढवल्याने मुद्रा योजनेची उद्दिष्ट साध्य करण्यात मदत होईल आणि नवीन उद्योजकांना ज्यांना निधीची जास्त गरज आहे ते आता त्यांच्या व्यवसायाच्या वाढीसाठी आणि विस्तारासाठी अधिक निधी उपलब्ध करून देऊ शकतील.
मुद्रा योजना कर्जाचे प्रकार
मुद्रा कर्ज योजनेअंतर्गत शिशु, किशोर आणि तरुण या तीन सेमी मध्ये कर्ज उपलब्ध करून दिलं जात आहे. आता तरुण प्लस नावाची नवीन श्रेणी सुरू करण्यात आली आहे.
1. शिशु या श्रेणी अंतर्गत 50 हजार रुपयांचा कर्ज दिले जाते.
2. किशोर योजनेअंतर्गत व्यवसाय करणारे 50 हजार ते पाच लाख रुपये पर्यंतचे मुद्रा कर्ज घेऊ शकतात.
3. तरुण योजनेअंतर्गत पाच लाख ते दहा लाख रुपये पर्यंत कर्ज देण्याचा नियम आहे. तरुण योजनेअंतर्गत घेतलेले कर्ज यशस्वीरित्या परत केलेल्या व्यावसायिकांना आता त्यांच्या व्यवसायाच्या वाढीसाठी आणि विस्तारासाठी तरुण प्लस श्रेणी अंतर्गत दहा लाख तेवीस लाख रुपये पर्यंतचे कर्ज मिळू शकणार आहे. प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत मायक्रो युनिट साठी क्रेडिट गॅरंटी फंड अंतर्गत वीस लाख रुपये पर्यंतच्या कर्जावर हमी कवरेज दिले जाईल.
योजनेचा लाभ घेण्यासाठी अटी काय?
कर्जासाठी अर्ज करणारी व्यक्ती भारताची नागरिक असणे आवश्यक आहे.
व्यक्तीचे वय 18 वर्षापेक्षा जास्त असावे.
अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे बँक खाते असणे आवश्यक आहे. तसेच कोणताही व्यवसाय ज्यासाठी मुद्रा कर्ज घ्यायचे आहे की कॉर्पोरेट संस्था नसावी.
अर्ज करणाऱ्या व्यक्तीचा कोणताही बँक डिफॉल्ट इतिहास नसावा.
मुद्रा कर्ज घेण्यासाठी लागणारी कागदपत्रे:
1. ओळखीचा पुरावा-मतदान ओळखपत्र, आधार कार्ड इत्यादी.
2. रहिवासी पुरावा उदा -लाईट बिल,घर पावती
3. आपण जो व्यवसाय करणार आहोत किंवा करत आहोत त्यांचा परवाना व स्थायी पत्ता
4. व्यवसायासाठी लागणारे मटेरियल किंवा यंत्रसामुग्री इत्यादी त्यांचे कोटेशन व बिले.
5. आपण ज्या व्यापाराकडून मान घेतला त्याचे पूर्ण नाव व पत्ता.
6. अर्जदाराचे 2 फोटो
कर्जाचे फायदे :
कर्जत आलं मुक्त आहे आणि त्यावर कोणतेही प्रक्रिया शुल्क नाही.या योजनेअंतर्गत उपलब्ध कर्जाचे एकूण परतफेड कालावधी बारा महिने ते पाच वर्षापर्यंत आहे.
पण जर तुम्ही पाच वर्षात परतफेड करू शकत नसाल तर तुमचा कार्यकाळ आणखी पाच वर्षांनी वाढवला जाऊ शकतो.
या कर्जाची चांगली गोष्ट म्हणजे तुम्हाला मंजूर केलेल्या कर्जाच्या संपूर्ण रकमेवर व्याज द्यावे लागत नाही. हा तुम्ही मुद्रा कार्डद्वारे काढलेले आणि खर्च केलेला रकमेवरच व्याज आकारले जाते.
तुम्ही भागीदारात कोणता व्यवसाय करत असाल तर मुद्रा योजनेद्वारे कर्ज घेऊ शकता. यामध्ये तुम्हाला तीन श्रेणीमध्ये कर्ज मिळते. व्याजदर श्रेणीनुसार बदलतात.
मुद्रा योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो?
देशातील कोणीही व्यक्ती जो स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यास इच्छुक आहे, तो प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजनेअंतर्गत (Pradhanmantri mudra loan Yojana) कर्ज घेऊ शकतो. जर तुम्ही सध्या असलेला व्यवसाय वाढवणार असाल आणि त्याच्यासाठी पैशाची आवश्यकता असेल तर तुम्ही प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत दहा लाख रुपये पर्यंतच्या कर्जासाठी अर्ज करू शकता.
अर्ज करण्याची प्रक्रिया
शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जा.
होम पेज उघडल्यावर तुम्हाला शिशु, किशोर आणि तरुण कर्जाचे पर्याय दिसतील.
आता अर्ज डाऊनलोड करा आणि प्रिंट करा.
त्यात विचारलेली सर्व माहिती नीट भरा.
यानंतर अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांची छायाप्रत संलग्न करा.
व्यवसाय कर्जासाठी तरुण कर्ज निवडा.
भरलेल्या फॉर्ममध्ये दिलेली माहिती पुन्हा एकदा वाचा आणि काळजीपूर्वक तपासा. यानंतर , समाधान झाल्यावर, हा भरलेला अर्ज बँकेत जमा करा.
तुमची माहिती तपासल्यानंतर बँक ती मंजूर करेल आणि कर्ज पास करेल.
लक्षात ठेवा की Mudra कर्ज अर्जासाठी मागील दोन वर्षाचा आयकर रिटर्न (ITR) आवश्यक आहे. हे कर्ज दादांना व्यवसायाच्या आर्थिक आरोग्याचे आणि स्थिरतेचे मूल्यांकन करण्यास मदत करते. सर्व आवश्यक कागदपत्रे व्यवस्थित असल्याची खात्री करून, अर्जदार कर्ज मंजुरीची प्रक्रिया सुलभ करू शकतात आणि Mudra योजनेद्वारे निधी मिळवण्याची त्यांची शक्यता वाढवू शकतात.