Navi App वरून 15,000 रु वैयक्तिक कर्ज कसे मिळवायचे? पहा संपूर्ण माहिती..|Navi App 15k Personal Loan

|

नमस्कार, सदरच्या लेखामध्ये आपण Navi App वरून 15,000 रु वैयक्तिक कर्ज (Navi App 15,000 Personal Loan) कसे घ्यायचे याविषयीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. यामध्ये आपण नावी अँप वरून वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी कोणती पात्रता आवश्यक असते? त्याचबरोबर सदर वैयक्तिक कर्जाचा व्याजदर व परतफेड चा कालावधी किती आहे? सदर कर्जासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे कोणती आहेत? नावी अँप वरून वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी अर्ज कसा करायचा? ही माहिती आपण सदर लेखांमध्ये पाहूया.

जीवनामध्ये पैसा हा एक मूलभूत गरज म्हणून ओळखला जात आहे. माणसाच्या अत्यावश्यक गरजा त्याचबरोबर भविष्यातील योजना पूर्ण करण्यासाठी पैसा हा महत्त्वाची भूमिका बजावत असतो. भविष्यातील गरजांसाठी मोठ्या रकमेची गरज असते त्याचबरोबर अत्यावश्यक गरजा भागवण्यासाठी कमी रक्कम लागू शकते. मोठ्या रकमेची गरज ही बँका किंवा वित्तीय संस्थेकडून पूर्ण केली जाते परंतु लहान रक्कम ही शक्यतो बॅंका किंवा वित्तीय संस्था कडून मिळणे खूप अवघड असते. अशा लहान स्वरूपातील वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत असाल तर तुम्हाला Navi App हा एक उत्तम पर्याय आहे. Navi App वरून तुम्ही कमी रकमेची वैयक्तिक कर्जे घेऊ शकता तेही कमी कागदपत्रासह तुमचा आवश्यक तपशील देऊन तुमचे कमी रकमेचे कर्ज त्वरित मंजूर केले जाते आणि तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाते.

Navi App विषयी थोडक्यात…

Flipkart चे को-फाउंडर सचिन बंसल यांनी नावी कर्ज आणि आरोग्य विमा ॲप विकसित केले आहे. जे एक सुलभ आणि सोयीस्कर डिजिटल वैयक्तिक कर्ज देण्याचे ॲप म्हणून काम करते. Navi App वरून जर एखादी व्यक्ती वैयक्तिक कर्ज घेणार असेल तर त्याच्याकडे आधार कार्ड आणि पॅन कार्ड असेल तर त्याला तात्काळ कर्ज दिले जाते. कर्जाच्या अर्जाची प्रक्रिया ही अत्यंत सोपी आणि पूर्णपणे ऑनलाईन असून कोणाशीही प्रत्यक्ष भेट किंवा संवादाची आवश्यकता सुद्धा भासत नाही. Navi App वैयक्तिक कर्ज प्रक्रिया ही 100% पेपरलेस आहे. सदरचे कर्ज घेण्यासाठी तारण किंवा जामीनदाराची आवश्यकता नसते.

Navi App चे व्यवस्थापन Navi Technology Limited द्वारे केले जाते. ही कंपनी नॉन डिपॉझिट ट्रेकिंग NBFC (ND-SI) जी आर बी आय कायदा 1934 च्या कलम 45A अंतर्गत भारतीय रिझर्व बँक मध्ये नोंदणीकृत आहे. म्हणजेच नावी ॲप आरबीआयच्या नियमक फ्रेमवर्क मध्ये काम करते आणि कायदेशीर भारतीय संस्था म्हणून ओळखले जाते. Navi App हे कमीत कमी 30 वर्षाच्या कालावधीसाठी 5 कोटी रुपये किंवा मालमत्ता मूल्याच्या 90% पर्यंत गृहकर्ज ही देते, शिवाय नावी आरोग्य विमा आणि मॅच्युअल फंड सुद्धा ऑफर करते.

Navi App 15k Personal Loan व्याजदर व परतफेडीचा कालावधी

नावी ॲप वरून घेतलेल्या वैयक्तिक कर्जाचे व्याजदर निश्चित आहेत, परंतु सदरचे व्याजदर हे 9.9% पर्यंत वार्षिक जाऊ शकतात. सदरचे व्याजदर हे तुम्ही किती कर्ज घेता त्याच बरोबर सदरचे कर्ज परत करण्यासाठी तुम्ही किती वेळ घेता आणि तुम्ही कर्जासाठी पात्र आहात का यावर अवलंबून असतात. सदरची कर्ज घेण्यासाठी तुम्हाला प्रक्रिया शुल्कही द्यावे लागते.

Navi App वैयक्तिक कर्ज परतफेडीचा कालावधी किमान 3 महिने ते कमाल72 महिन्यांचा आहे.

Navi App 15k Personal Loan पात्रता

नावी ॲप वरून वैयक्तिक कर्ज घेताना अर्जदार व्यक्तीला काही अटी व शर्ती मध्ये पात्र होणे आवश्यक असते. सदरच्या अटी व शर्ती कोणत्या आहेत ते खालीलप्रमाणे:

  • सदर कर्जासाठी अर्ज करणारी व्यक्ती भारतीय नागरिकांनी आवश्यक आहे.
  • त्याचबरोबर सदर व्यक्तीचे वय किमान 21 ते कमाल 65 वर्षे असणे आवश्यक आहे.
  • सदर कर्जासाठी अर्ज करणारी व्यक्ती ही पॅन कार्ड धारक त्याचबरोबर नोकरदार किंवा स्वयंरोजगार करणारी असावी.
  • Navi App वरून वैयक्तिक कर्जासाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे मासिक उत्पन्न हे किमान 10,000 रुपये असणे आवश्यक आहे.
  • त्याचबरोबर अर्ज करणाऱ्या व्यक्तीचा सिबिल स्कोर हा चांगला असणे आवश्यक आहे, जेणेकरून सिबिल स्कोर वर तुम्हाला त्वरित कर्ज मिळण्याची शक्यता जास्त असते.

Navi App 15k Personal Loan आवश्यक कागदपत्रे

Navi App वरून वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी अर्जदाराला खालील कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे. सध्याची कागदपत्रे कोणती आहेत ते खालीलप्रमाणे:

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • मोबाईल सेल्फी फोटो
  • मागील 6 महिन्याचे बँक स्टेटमेंट
  • पगार स्लिप्स

Navi App 15k Personal Loan अर्ज कसा करायचा?

Navi App वरून वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी अर्ज कसा करायचा याविषयीची स्टेप बाय स्टेप माहिती खालीलप्रमाणे:

  • सर्वप्रथम तुमच्या मोबाईल मध्ये Google Play Store वरून तुम्हाला Navi App डाऊनलोड करावे लागेल.👇🏼👇🏼👇🏼 https://play.google.com/store/apps/details?id=com.naviapp
  • त्यानंतर तुम्हाला हे ॲप ओपन करून त्यामधील वैयक्तिक कर्ज या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
  • नंतर तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबर वरून साइन अप करावे लागेल.
  • त्यानंतर तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती भरावी लागेल जेणेकरून तुम्ही सदर कर्जासाठी पात्र आहात का ते माहित होईल.
  • त्यानंतर तुम्हाला हवी असलेली कर्ज रक्कम आणि ईएमआय रक्कम निवडा.
  • केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी एक सेल्फी आणि तुमचे आधार कार्ड अपलोड करा.
  • त्यानंतर तुमचे बँक तपशील भरा जेणेकरून तुमच्या कर्जाची रक्कम सदर बँक खात्यामध्ये ट्रान्सफर करता येईल.
  • वरील सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सबमिट या बटणावर क्लिक करा.

अशा सोप्या पद्धतीने तुम्ही Navi App वरून वैयक्तिक कर्जासाठी अर्ज करू शकता.

सदर लेखामध्ये आपण Navi App 15k Personal Loan कसे घ्यायचे याविषयीची संपूर्ण माहिती पाहिली आहे. सदर माहितीच्या आधारे तुम्ही नावी ॲपवरून कमी रकमेचे वैयक्तिक कर्ज घेऊन तुमच्या तात्पुरत्या अत्यावश्यक गरजा पूर्ण करू शकता. धन्यवाद!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *