पीएम स्वनिधी योजनेअंतर्गत विनातारण 50 हजार रु कसे मिळवायचे? जाणून घ्या संपूर्ण माहिती..|PM Swanithi Yojana 50k Loan

नमस्कार, भारत हा तरुणांचा देश म्हणून जगभरामध्ये ओळखला जातो. देशातील तरुणांना स्वावलंबी बनवण्यासाठी रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी राज्य आणि केंद्र सरकारमार्फत विविध अशा रोजगाराच्या योजना राबवल्या जात आहेत. याशिवाय देशातील छोट्या व्यवसायामध्ये गुंतलेल्या लोकांवर ही सरकार विशेष लक्ष देत आहे. यासाठी सरकार एक खूप महत्त्वाची योजना राबवत आहे ती म्हणजे पीएम स्वनिधी योजना होय. सदर योजनेअंतर्गत रस्त्यावरील विक्रेत्यांना त्यांचा व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी केंद्र सरकारद्वारे 10 हजार रुपयांपासून 50 हजार रुपयापर्यंत कर्ज स्वरूपात मदत केली जाते. म्हणूनच आपण सदर लेखांमध्ये पीएम स्वनिधी योजनेविषयीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. यामध्ये सदर योजनेसाठी लागणारी पात्रता काय आहे? कोणकोणत्या कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे? पीएम स्वनिधी योजनेसाठी अर्ज कसा करायचा? ही माहिती आपण संक्षिप्त स्वरूपात पाहणार आहोत. चला तर मग पाहूया पीएम स्वनिधी योजना काय आहे?

पीएम स्वनिधी योजनेविषयी थोडक्यात…

केंद्र सरकारने देशातील सुमारे 50 लाख रस्त्यावरील विक्रेत्यांना त्यांचा व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा व्यवसायामध्ये वाढ करण्यासाठी 10 हजार रुपयांपासून ते 50 हजार रुपयांपर्यंतचे भांडवल विनाकारण एक वर्षासाठी उपलब्ध करून देण्यासाठी सदर योजना सुरू केली आहे. सदर योजनेअंतर्गत घेतलेल्या रकमेची वेळेवर परतफेड केल्यास आणि व्यवहारामध्ये डिजिटल पेमेंटचा उपयोग केल्यास सदर विक्रेत्यांना व्याज भरावे लागणार नाही. उलट त्यांना उत्तम परतफेड करण्याच्या वृत्तीला प्रोत्साहन म्हणून 7% प्रति वार्षिक दराने व्याज अनुदान आणि डिजिटल व्यवहाराला प्रोत्साहन म्हणून प्रति वर्ष 1200 रुपयांपर्यंत कॅशबॅक देण्यात येणार आहे.

पीएम स्वनिधी योजनेची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक जून 2020 पासून केली आहे. सदर योजनेचा लाभ पथविक्रेते, भाज्या विक्रेते, फळे विक्रेते, रस्त्याच्या कडेला असणारे दुकानदार यांना होणार आहेत.

पीएम स्वनिधी योजनेची उद्दिष्टे

  • कोरोना व्हायरस या साथीच्या आजारामुळे देशाची संपूर्ण अर्थव्यवस्था विस्कळीत झालेली होती, या महामारीच्या काळात लोक घराबाहेर पडू शकले नाहीत त्यामुळे छोट्या छोट्या व्यवसायाची स्थिती खूपच दयनीय झाली होती. अशा परिस्थितीमध्ये रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्यांना, फळे व भाज्या विक्रेत्यांना, त्याचबरोबर अन्य छोट्या उद्योजकांना अनेक अडचणीचा सामना करावा लागला होता.
  • वरील समस्या लक्षात घेऊन केंद्र सरकारने पीएम स्वनिधी योजना सुरू केली, सदर योजनेअंतर्गत या लोकांना त्यांचा व्यवसाय पुन्हा सुरू करण्यास मदत मिळणार आहे. व्यवसाय सुरू करण्यासाठी त्यांना केंद्र सरकारकडून 10 हजार रुपयांपासून 50 हजार रुपयापर्यंतचे कर्ज दिले जाईल. सदर लोकांना या योजनेअंतर्गत स्वावलंबी आणि सशक्त बनवणे हे मुख्य उद्दिष्ट आहे. जेणेकरून अशा लोकांना पुन्हा व्यवसाय सुरू करण्यासाठी कोणत्याही अडचणीचा सामना करावा लागू नये. या सर्व बाबींचा विचार करून केंद्र सरकारने प्रधानमंत्री स्वनिधी योजना सुरू केली आहे.

पीएम स्वनिधी योजना फायदे

  • पीएम स्वनिधी योजनेअंतर्गत देशातील 50 लाखांहून अधिक लोकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
  • रस्त्याच्या कडेला सामान विक्री करणारे शहरी ग्रामीण भागात राहणारी लोक स्ट्रीट वेंडर सेल्फ रिलायंट फंड योजनेअंतर्गत लाभार्थी मानले जातील.
  • केंद्र सरकार रस्त्यावरील विक्रेते व छोट्या व्यावसायिकांना विशेष पीएम स्वनिधी योजनेचा लाभ देते.
  • पी एम स्वनिधी योजनेअंतर्गत देशातील पथविक्रेते 10,000 रुपयांपासून 50,000 रुपयांपर्यंत भांडवली कर्ज घेऊ शकतात. सदर भांडवली कर्जाचा लाभार्थी वर्षभर सुलभ हप्त्यामध्ये परतफेड करू शकतात.
  • सदर योजनेअंतर्गत एखाद्या व्यक्तीने कर्ज घेतल्यास आणि कर्जाची रक्कम वेळेपूर्वी परत केल्यास केंद्र सरकार सदर व्यक्तीला 7% वार्षिक व्याज त्याच्या बँक खात्यात अनुदान म्हणून जमा करेल.
  • कोरोना महामारीच्या काळात बंद पडलेला व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा सुधारण्यासाठी ही योजना खूपच महत्त्वाची आहे.

पीएम स्वनिधी योजना पात्रता

  • पीएम स्वनिधी योजनेसाठी अर्ज करणारा अर्जदार हा भारताचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • रस्त्यावरील विक्रेते त्याच बरोबर रस्त्याच्या कडेला स्टेशनरी दुकाने आणि छोटे कारागीर सदर योजनेसाठी अर्ज करू शकतात.
  • कोरोना महामारीमुळे ज्यांच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे ते या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणत्याही तारणाची/गॅरेंटरची आवश्यकता नाही.
  • सदर योजनेचे लाभार्थी कर्ज एक रकमे किंवा हप्त्याच्या स्वरूपात जमा करू शकतात.

पीएम स्वनिधी रोजगार योजना आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • मतदार ओळखपत्र
  • रेशन कार्ड
  • बँक पासबुक
  • पासपोर्ट साईज फोटो

पीएम स्वनिधी योजनेसाठी वरील कागदपत्रांची आवश्यकता असते.

पीएम स्वनिधी योजना अर्ज कसा करायचा?

पी एम स्वनिधी योजनेसाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करावा लागतो. सदरचा अर्ज कसा करायचा याविषयीची स्टेप बाय स्टेप माहिती खालीलप्रमाणे:

  • पीएम स्वनिधी योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला केंद्र सरकारच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.👉🏽 https://pmsvanidhi.mohua.gov.in
  • वेबसाईट ओपन केल्यानंतर होम पेजवर जाऊन Apply Loan 10k/Apply Loan 20k/Apply Loan 50k यापैकी कोणत्याही एका ऑप्शनवर क्लिक करा.
  • नंतर तुम्ही तुमचा मोबाईल नंबर टाका. त्यानंतर तुमच्या मोबाईलवर SMS च्या माध्यमातून एक OTP येईल.
  • OTP पडताळणी झाल्यानंतर तुमच्यासमोर रजिस्ट्रेशन फॉर्म येईल.
  • सदर फॉर्मचे प्रिंट आउट काढून घ्या.
  • त्यानंतर संपूर्ण फॉर्म भरून सदर योजनेसाठी लागणारी सर्व आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा.
  • केंद्र सरकारने निश्चित केलेल्या स्वनिधी केंद्रावर जाऊन फॉर्म सहित सर्व आवश्यक कागदपत्रे जमा करा.
  • अर्जाची पडताळणी केल्यानंतर स्वनिधी योजनेअंतर्गत कर्जाची रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होईल.

अशा सोप्या पद्धतीने अर्ज करून तुम्ही पीएम स्वनिधी योजनेचा लाभ घेऊ शकता.

सदर लेखामध्ये आपण पीएम स्वनिधी योजनेविषयीची संपूर्ण माहिती पाहिली आहे. या माहितीच्या आधारे तुम्ही सदर योजनेचा लाभ घेऊन नवीन व्यवसाय किंवा व्यवसायामध्ये वाढ करू शकता. धन्यवाद!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *